३७ वर्षांपूर्वी इराणी विमान अमेरिकेने लक्ष्य केलं होतं? २९० प्रवाशांना मिळाली होती जलसमाधी
इराणविरोधातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ३ जुलै १९८८ रोजी अमेरिकेच्या नौदलाने चुकून इराण एअर फ्लाईट ६५५ हे नागरी विमान पाडले. या घटनेत २९० प्रवासी मृत्युमुखी पडले. अमेरिकेच्या नौदलाने विमानाला इराणचे लढाऊ विमान समजून क्षेपणास्त्र हल्ला केला. वॉशिंग्टनने याला 'दुर्दैवी चूक' म्हटलं, तर इराणने 'मानवतेविरुद्धचा गुन्हा' म्हणून निषेध केला. १९९६ मध्ये अमेरिकेने जबाबदारी स्वीकारून भरपाई दिली.