इराणचा बहरीन, युएईवर भीषण हल्ला; ‘अल्बा’ अॅल्युमिनियम प्रकल्प उद्ध्वस्त
मध्य-पूर्वेतील संघर्ष आता आर्थिक आणि औद्योगिक पायाभूत सुविधांवर पोहोचला आहे. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) बहरीनमधील 'ॲल्युमिनियम बहरीन' आणि संयुक्त अरब अमिरातीमधील 'एमिरेट्स ग्लोबल ॲल्युमिनियम' प्रकल्पांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हे प्रकल्प अमेरिकन संरक्षण उत्पादनाशी जोडलेले असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे ॲल्युमिनियमच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आणि अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.