मध्यपूर्वेत तणाव शिगेला! इराणचा अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानावर हल्ला
इराणच्या हल्ल्यादरम्यान अमेरिकेच्या एफ-३५ लढाऊ विमानावर निशाणा साधण्यात आला, ज्यामुळे त्याला मध्यपूर्वेतील लष्करी तळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (आयआरजीसी) हा दावा केला आहे. विमानाला गंभीर नुकसान झाले असून, ते कोसळले असण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने विमान सुरक्षित उतरल्याचे सांगितले आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे.