इराणच्या तेल टँकरचा मार्ग बदलला; पेमेंटच्या वादावर सरकारने दिले मोठे स्पष्टीकरण!
इराणमधून कच्चे तेल घेऊन येणारा टँकर चीनकडे वळल्याच्या वृत्ताचे भारताने खंडन केले आहे. सरकारने स्पष्ट केले की, पेमेंटच्या समस्येमुळे टँकरचा मार्ग बदलला नसून, जागतिक तेल व्यापारात प्रवासादरम्यान जहाजांचे मार्ग बदलणे सामान्य प्रक्रिया आहे. भारत ४० हून अधिक देशांतून कच्चे तेल आयात करतो आणि भारतीय रिफायनर्सनी इराणसह इतर ठिकाणांहून आपली गरज सुरक्षित केली आहे.