इराणच्या ‘सायलेंट हंटर्स’ची अमेरिकेला भीती; काय आहे घादीर पाणबुड्यांचा ‘गनिमी कावा’?
होर्मुझ सामुद्रधुनीत इराण आणि अमेरिका-इस्रायलमध्ये तणाव वाढला आहे. इराणच्या 'घादीर' पाणबुड्या, ज्यांना 'सायलेंट हंटर्स' म्हटलं जातं, अमेरिकेच्या नौदलासाठी मोठी डोकेदुखी ठरल्या आहेत. या पाणबुड्या उथळ पाण्यात काम करतात आणि सोनारलाही चकवा देतात. त्यांची मुख्य ताकद टॉर्पेडो, क्रूझ मिसाइल, आणि पाणसुरुंगांमध्ये आहे. या पाणबुड्या थेट युद्ध जिंकण्यासाठी नसून, शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी वापरल्या जातात.