‘आमचा तो हेतू नव्हता’, इराणच्या अध्यक्षांनी मागितली मुस्लीम देशांची माफी
इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील मुस्लीम राष्ट्रांची माफी मागत क्षेपणास्त्र हल्ले थांबविण्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, इराण इतर देशांवर हल्ला करणार नाही, जोपर्यंत त्यांच्यावर हल्ले होत नाहीत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणने प्रत्युत्तरादाखल आखाती देशांतील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले होते. पेझेश्कियान यांनी अमेरिका-इस्रायलसमोर शरणागती पत्करणार नसल्याचेही सांगितले.