इराणच्या अध्यक्षांनी घेतला हिंदू आध्यात्मिक गुरूंचा आशीर्वाद? व्हायरल VIDEO चं सत्य काय?
दिल्लीतील १८ वी ब्रिक्स शिखर परिषदेत इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान सहभागी झाले होते. या दरम्यान, पेझेश्कियान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात ते हिंदू आध्यात्मिक गुरूंच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहेत. मात्र, इराणी दूतावासाने हा व्हिडीओ खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हिडीओमध्ये पेझेश्कियान खाली पडलेले पत्र उचलताना दिसत आहेत, आणि हा क्षण चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे.