युद्ध थांबणार की पुन्हा भडकणार? इराण-अमेरिका चर्चेत मोठे ‘पेच’
अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधी चर्चेत काही प्रगती झाली असली तरी, अंतिम करारासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा आणि जहाजांवर शुल्क लावण्याच्या प्रस्तावामुळे तणाव वाढला आहे. चर्चेत मतभेद कायम असून, तात्पुरत्या शस्त्रसंधीचा करार वाढवला जाणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.