इराणचा यूएईवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला; फुजैरामध्ये ३ भारतीय नागरिक जखमी
पश्चिम आशियातील युद्ध काही दिवसांपासून शांत होते, परंतु ४ मे रोजी इराणने संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. युएइच्या यंत्रणेने ही माहिती दिली आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत आणि फुजैरा तेल प्रकल्पाच्या क्षेत्रात आग लागली आहे.