“युद्ध जवळपास संपण्याच्या मार्गावर”, ट्रम्प यांच्या विधानामुळे जगभरातील देशांना दिलासा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका युद्ध जवळपास संपत आल्याची आशादायी प्रतिक्रिया दिली आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे युद्ध संपण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. इराणला तडजोड करायची तीव्र इच्छा आहे, असेही ते म्हणाले. इस्लामाबाद येथे झालेली शांतता बैठक अनिर्णित राहिली असून, दुसरी फेरी होणार आहे. युद्धविरामाची मुदत संपल्यानंतर युद्धबंदीची घोषणा होण्याची शक्यता आहे.