इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहूंची कसोटी; पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग का सोपा नाही?
गाझा संघर्ष, इराणसोबतचा तणाव आणि लेबनॉनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये 'क्नेसेट' (संसद) निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ ला हमासने केलेल्या हल्ल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच राष्ट्रीय निवडणुकीत पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इस्त्रायलमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे ठरत आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.