पंतप्रधनांच्या मेकअपवर ७ वर्षांत ४.५ कोटींचा खर्च; ९० टक्के रक्कम नेतान्याहूंनी उधळली
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या हेअरस्टाईल, मेकअप आणि व्यक्तिमत्त्व सादरीकरणावर २०१९ ते २०२६ दरम्यान सरकारी तिजोरीतून ४.५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यातील ९० टक्के खर्च नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीवर झाला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती उघड झाली. नेतान्याहूंच्या कार्यकाळात मेकअप खर्चात मोठी वाढ झाली असून, परदेश दौऱ्यांदरम्यानही मोठा खर्च झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत हेअरस्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट यांची नावे लपवण्यात आली आहेत.