इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी कॅप्टन स्मित मच्छार अन् PM मोदींना विशेष निमंत्रण
फ्लाईदुबई विमानातील आणीबाणीच्या परिस्थितीनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी संवाद साधला. नेतान्याहू यांनी मच्छार यांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रित केलं. मच्छार यांनी संकटसमयी कॉकपिटचा दरवाजा उघडून प्रवाशांना वाचवलं. नेतान्याहू यांनी मच्छार यांना इस्रायलचे आणि जगाचे हिरो म्हणून गौरविलं.