खासगीकरणाच्या चर्चांवर ISRO ने केला मोठा खुलासा; निवेदनात काय म्हटलं? वाचा!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) खासगीकरण होणार असल्याच्या चर्चांना इस्रोने फेटाळून लावले आहे. इस्रोने स्पष्ट केले की, इस्रोचे खासगीकरण होणार नाही आणि त्याचे महत्त्व कमी होणार नाही. इस्रोने अंतराळ क्षेत्रातील सुधारणा आणि तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. खासगी क्षेत्राचा सहभाग म्हणजे इस्रोची भूमिका कमी करणे नव्हे, तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणे हा उद्देश आहे.