Crime Triple Murder Pune: ‘जय भीम’ टॅटूमुळे कसे उलगडले तिहेरी हत्याकांड?
रांजणगाव MIDC परिसरात २५ मे २०२५ रोजी तीन अर्धवट जळलेले मृतदेह सापडले. तपासात स्वाती सोनवणे आणि तिच्या दोन मुलांची ओळख पटली. गोरख बोखारेने कौटुंबिक वादातून स्वाती आणि तिच्या मुलांचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी CCTV फुटेज आणि फोरेन्सिक तपासाच्या आधारे गोरखला अटक केली. अचानक आलेल्या पावसाने गुन्हेगाराचे मनसुबे उधळले आणि पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यास मदत केली.