जपानने तब्बल २० वर्षांनंतर भारतीय आंब्यांच्या आयातीवर घातली बंदी; ‘हे’ आहे कारण
जपानने २० वर्षांनंतर भारतीय आंब्यांची आयात थांबवली आहे. भारतीय प्रक्रिया केंद्रांमधील कीड-नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे हापूस, केसर, लंगडा आणि बंगनपल्ली आंब्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. जपानने फळमाशीसारख्या कीटकांविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण अवलंबले आहे. भारत सरकार जपानसोबत चर्चा करत आहे, अशी माहिती मँगो ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एस. इंसाराम अली यांनी दिली.