“फक्त एका धर्माला लक्ष्य केलं जात आहे”, वक्फ बोर्ड विधेयकावर ओमर अब्दुल्लांचं टीकास्र!
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी वक्फ (सुधारणा) विधेयक २०२४ वर टिप्पणी केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) या विधेयकाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी या विधेयकामुळे फक्त एका धर्माला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. २६ मार्च रोजी पाटण्यात आणि २९ मार्च रोजी विजयवाड्यात AIMPLB चे सदस्य आंदोलन करणार आहेत. वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवरून तणाव निर्माण झाला आहे.