‘…तर असा विकास कधीच टिकणार नाही’; माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे थेट विधान
नागपूर: विकास आणि समानता या पूरक संकल्पना आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. नालसार विधी विद्यापीठात 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सबस्टँटिव इक्वॅलिटी' या विषयावर बोलताना त्यांनी विकास न्यायसंगत, समावेशक आणि सर्वांना समान लाभ देणारा असावा, असे सांगितले. त्यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या, ऊसतोड मजुर महिलांवरील अन्याय यांचा उल्लेख केला. विकासामुळे असमानता वाढल्यास तो टिकाऊ ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.