ज्योती मल्होत्राची कबुली; “दानिशच्या सांगण्यावरुन दोनदा पाकिस्तान दौरा केला आणि..”
हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ज्योतीने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला भारतीय लष्कराची गोपनीय माहिती दिल्याचे मान्य केले आहे. तिने पाकिस्तानचा दोनदा दौरा केला आणि तिथे अली हसन व अन्य अधिकाऱ्यांशी भेट घेतली. ज्योतीने तिच्या युट्यूब चॅनलद्वारे पाकिस्तान दौरे केले होते. तिची चौकशी सुरू असून, तिने देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे कबूल केले आहे.