Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राची डायरी पोलिसांच्या हाती, पाकिस्तानला जाऊन आल्यानंतर काय काय लिहिलं?
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांना तिची डायरी मिळाली असून त्यात पाकिस्तानबाबतचे उल्लेख आहेत. ज्योतीने पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. ती पाकिस्तान आणि चीनला अनेकदा गेली होती. तिच्या लॅपटॉप आणि फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. ज्योतीच्या सोशल मीडियाचीही तपासणी केली जात आहे.