ज्योती मल्होत्राशी ओडिशाच्या यूट्यूबर तरुणीचं कनेक्शन? पाकिस्तानातही गेली होती सोबत!
हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. तिची सखोल चौकशी सुरू असून, तिच्या मैत्रिणीचीही चौकशी केली जात आहे. या मैत्रिणीने ज्योतीसोबत पाकिस्तानातील कर्तारपूरला भेट दिली होती. ओडिशातील यूट्यूबरने आरोप फेटाळले असून, तिच्या वडिलांनीही मुलीचं नाव चुकीच्या पद्धतीने जोडल्याचं सांगितलं आहे.