“माझ्या बेडरूमबद्दल दिवास्वप्नं पाहू नका”, कंगनाचे बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर
योगगुरु बाबा रामदेव यांनी कंगना रणौतवर 'गटर जनरेशन' विधानावरून टीका केली होती. यावर कंगनाने इन्स्टाग्रामवर प्रत्युत्तर देत, बाबा रामदेव यांना आपल्याला चारित्र्याचे धडे देऊ नयेत, असा सल्ला दिला. तिने आपल्या तारुण्य किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्नं पाहू नका, असेही म्हटले. कंगनाने सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यावरूनही रामदेव यांच्यावर उपरोधिक टीका केली.