“ट्रम्प अल्फा मेल, पण आमचे पंतप्रधान…”, कंगना रणौतनं काही वेळातच डिलीट केली ‘ती’ पोस्ट
अभिनेत्री कंगना रणौतने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारी पोस्ट एक्सवर शेअर केली होती. ट्रम्प यांनी टिम कुक यांना भारतात आयफोनची निर्मिती करू नये, असे सांगितल्यावर कंगनाने काही मुद्दे मांडले होते. भाजपाचे नेते जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून कंगनाने ही पोस्ट डिलीट केली आणि दिलगिरी व्यक्त करणारी नवी पोस्ट टाकली.