‘बाहेर चांगले बोलतात, देशात मात्र मौन’, मोहन भागवत यांच्या भाषणावर कपिल सिब्बल यांची टीका
ज्येष्ठ वकील आणि राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील भाषणावर टीका केली. भागवत यांनी 'विविधतेत एकता' हा भारताचा डीएनए असल्याचे म्हटले होते. सिब्बल यांनी एक्सवर पोस्ट लिहून "शब्दांनी काही होत नाही, कृतीतून हे दिसायला हवे" असे म्हटले.