“त्यांचं घर अर्ध पाकिस्तान” भाजपा आमदाराचं काँग्रेस मंत्र्याबाबत विधान; न्यायालयानं…
कर्नाटकमध्ये भाजप आमदार बासनागौडा पाटील यतनाल यांनी काँग्रेसचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांच्या घराबद्दल 'अर्ध पाकिस्तान' असे विधान केले होते. यावर गुंडू राव यांच्या पत्नी तबू राव यांनी तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचले असून न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांनी यतनाल यांना परखड शब्दांत खडसावले आहे. यतनाल यांनी आपल्याविरोधातील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.