मुस्लीम महिला IAS अधिकाऱ्याबद्दल भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान, पाकिस्तानी म्हटले
भाजप आमदार एन. रविकुमार यांनी आयएएस अधिकारी फौजिया तरन्नुम यांना पाकिस्तानी म्हटल्याने कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना फटकारले. न्यायाधीश नागप्रसन्ना यांनी रविकुमार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आणि राजकारण्यांनी संयम दाखवावा असे सांगितले. त्यांनी असे विधान केल्याने न्यायालयांवर अतिरिक्त बोजा येतो असेही नमूद केले. रविकुमार यांनी माफी मागितली असली तरी न्यायालयाने धर्माच्या आधारावर असे विधान करणे योग्य नाही असे स्पष्ट केले.