कर्नाटकचे मंत्री सतीश जारकिहोळींच्या ठिकाणांवर ‘ईडी’ची छापेमारी; ३.३ कोटींची रोकड जप्त
कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. २१ ठिकाणी झालेल्या कारवाईत ३.३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. जारकिहोळी यांनी सर्व आरोप फेटाळले असून, काँग्रेसने ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून झाल्याचा आरोप केला आहे.