कोचिंगला फाटा, घरबसल्या ‘सेल्फ स्टडी’ आणि थेट ६७ वी रँक; IAS कस्तूरी पांडा यांची यशोगाथा
ओडिशाच्या कस्तूरी पांडा यांनी दिल्लीच्या महागड्या कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून २३ व्या वर्षी ६७ वी रँक मिळवली. एनआयटी राउरकेलातून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी १००६ गुण मिळवून यश मिळवले. कस्तूरी यांनी 'सेल्फ स्टडी' आणि 'मॉक टेस्ट'वर भर दिला. त्यांच्या यशोगाथेने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.