साडी नेसून १६०० मीटर अनवाणी धावली होमगार्ड भरतीसाठी विधवा महिलेचा संघर्ष
झारखंडमधील कविता कुमारी यांनी होमगार्ड भरतीपूर्व चाचणीदरम्यान साडी नेसून आणि अनवाणी पायांनी १६०० मीटरची शर्यत ८ मिनिटांत पूर्ण केली. पतीच्या निधनानंतर कुटुंबासाठी होमगार्डची नोकरी त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. यूट्यूबच्या मदतीने सराव करणाऱ्या कविताला स्थानिक ॲथलेटिक्स अकादमीने मोफत मार्गदर्शन केले. त्यांच्या संघर्षाची कथा सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे.