KBC मध्ये ५० लाख जिंकल्या अन् आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात; कोण आहेत अमिता तोमर?
'कौन बनेगा करोडपती' (KBC) शोमध्ये ५० लाख रुपये जिंकणाऱ्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. २०२१ मधील पूरग्रस्तांच्या मदत निधीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तपासात १२७ बनावट बँक खात्यांमध्ये निधी वळवला गेला असल्याचे आढळले. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तोमर यांच्या वकिलांनी आरोप फेटाळले आहेत.