“हा तर RSS चा अजेंडा”, पिनारायी विजयन; संपूर्ण वंदे मातरम गाण्यावरून केरळमध्ये वादाला तोंड
केरळ विधानसभेत 'वंदे मातरम' गायनावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते पिनारायी विजयन यांनी आरएसएसवर टीका करत संपूर्ण वंदे मातरम गाणे गायनाची गरज नसल्याचे सांगितले. भाजपाने विधानसभेत संपूर्ण गाणे न गायल्यानं राष्ट्रीय गाण्याचा अपमान झाल्याचा आरोप केला. सीपीएमने धार्मिक श्रद्धांचे प्रतिनिधित्व करणारे भाग सरकारी समारंभात समाविष्ट करणे धर्मनिरपेक्षतेशी विसंगत असल्याचे म्हटले.