‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर आगपाखड केल्यावरून कारवाई!
केरळ सरकारने दोन आयएएस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारणावरून निलंबनाची कारवाई केली आहे. उद्योग व व्यापार मंडळाचे संचालक के. गोपालकृष्णन यांनी 'मल्लू हिंदू ऑफिसर्स' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केल्यामुळे आणि कृषीविकास विभागाचे विशेष सचिव एन. प्रशांत यांनी वरिष्ठांवर जाहीररीत्या आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. प्रशांत यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या फाईल्स गहाळ झाल्याचाही आरोप आहे.