अन्न-पाण्याशिवाय भयाण जंगलात हरवलेली शरण्या ४ दिवस कशी राहिली?
केरळमधील ३६ वर्षीय टेक प्रोफेशनल जी.एस. शरण्या २ एप्रिल रोजी ट्रेकिंगदरम्यान कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील ताडियांदामोल टेकड्यांच्या घनदाट जंगलात हरवली. तिच्याकडे फक्त ५०० एमएल पाणी होतं आणि मोबाईल स्वीच ऑफ झाला होता. चार दिवसांच्या संघर्षानंतर वन अधिकारी, नक्षलविरोधी पथक आणि स्थानिक आदिवासी समुदायांच्या मदतीने ती सापडली. या काळात तिने धैर्य आणि हास्य कायम ठेवले. वाचा तिची चित्तथरारक कहाणी.