वायनाड दुर्घटनेत कुटुंब आणि आता अपघातात जोडीदारही गमावला; केरळच्या श्रुतीची दुःखद कहाणी
केरळच्या वायनाड जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या भूस्खलनात २४ वर्षीय श्रुतीने संपूर्ण कुटुंब गमावलं. आता तिचा जोडीदार जेन्सनचा अपघातात मृत्यू झाला आहे. जेन्सनच्या निधनामुळे श्रुतीवर दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळला. वायनाड दुर्घटनेत श्रुतीच्या कुटुंबातील नऊ सदस्य मृत्युमुखी पडले होते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.