“मला रात्रभर झोप लागली नाही”, ममता बॅनर्जींचं डॉक्टरांना शेवटचं आवाहन, म्हणाल्या…
कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. डॉक्टरांनी मात्र त्यांच्या पाच कलमी मागण्यांवर तडजोड न करण्याचा इशारा दिला आहे.