कुवेतमध्ये इराणचा भीषण हल्ला; आणखी एका भारतीय कामगाराचा मृत्यू, मृतांचा आकडा ८ वर
पश्चिम आशियातील युद्ध अधिक तीव्र झाले असून भारतीय नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. सोमवारी पहाटे कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे युद्धात मृत भारतीयांची संख्या आठ झाली आहे. कुवेतच्या वीज आणि पाणी मंत्रालयाने हल्ल्याचा निषेध केला आहे. युएई, बहरीन आणि सौदी अरेबियामध्येही हवाई हल्ल्यांचे सायरन वाजले. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर युद्ध पाचव्या आठवड्यात पोहोचले आहे.