राबडी देवी नव्हे, कांती सिंग होत्या लालूंची मुख्यमंत्रीपदाची पहिली पसंती!
बिहारमध्ये या महिन्यात दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा आणि गेले दोन दशकं मुख्यमंत्रीपद सांभाळणार्या नितीश कुमारांचा सामना तेजस्वी यादव यांच्याशी आहे. लालूप्रसाद यादव प्रकृती ठीक नसल्याने ते प्रचारापासून दूर आहेत. त्यांचे धाकटे पुत्र तेजस्वी हेच आता देशात भाजपविरोधी आघाडीचा एक प्रमुख चेहरा मानला जातात. त्याच पार्श्वभूमीवर भारताच्या राजकीय इतिहासात लालू प्रसाद यादव यांना पंतप्रधानपदाने दिलेल्या हुलकावणीच्या घटनेचा आढावा घेण महत्त्वाचं ठरावं.