पंतप्रधान सभागृहात येण्याआधीच लोकसभेचं कामकाज तहकूब; महिला खासदार आमने-सामने
लोकसभा तहकूब : राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिल्यानंतर, आज लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली आणि ट्रेजरी बेंचजवळ गोंधळ घातला. भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी विरोधी पक्षाच्या महिला खासदारांवर पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा आरोप केला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला खासदार आमने-सामने आल्या, ज्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.