१८०० कोटी रुपयांच्या ‘त्या’ ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने पोलिसांसमोर झाडली स्वत:वर गोळी!
भोपाळमधील १८०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपीने पोलीस ठाण्यात दाखल होत स्वत: गोळी झाडून घेतली आहे. यात आरोपी जखमी झाला आहे. यावेळी पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रेमसुख पाटीदार असं या संशयित आरोपीचं नाव आहे. चौकशीपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.