“बलात्कार करणं हे पुण्याचं काम…” दोन मुलींचे वडील असणाऱ्या आमदाराचे लज्जास्पद विधान
मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार फूल सिंग बरैया यांच्या वादग्रस्त विधानामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. त्यांनी बलात्काराचा संबंध जात आणि धार्मिक श्रद्धांशी जोडला आहे. त्यांच्या विधानामुळे विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. बरैया यांनी दावा केला की अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांना लक्ष्य केले जाते. त्यांच्या विधानावर काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली आहे.