ममता बॅनर्जींना मोठा धक्का; शिंदे-अजित पवारांप्रमाणे ऋतब्रता बॅनर्जींचे बंड
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) अडचणीत आली आहे. निलंबित आमदार संदीपान साहा आणि ऋतब्रता बॅनर्जी यांनी विधानसभेत ५० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची मागणी केली आहे. टीएमसीला ८० जागा मिळाल्या असून, बंडखोर गटाने महाराष्ट्र मॉडेल राबवण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाविरोधात पक्षात नाराजी वाढत आहे.