कॅरी बॅगसाठी १० रुपये, ग्राहकानं ठोकला ४ कोटींचा दावा; ग्राहकालाच बसला १० हजारांचा दंड
हैदराबादमधील एका ग्राहकाने खरेदीनंतर कॅरी बॅगेसाठी १० रुपये आकारल्याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रार केली आणि ४ कोटींची नुकसान भरपाई मागितली. मात्र, आयोगाने तपासात आढळले की, तक्रारदाराने अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे आयोगाने तक्रारदाराला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यातील ५ हजार रुपये विक्रेत्याला आणि उर्वरित ५ हजार रुपये ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले.