“दोन-तीन लग्न करणे गुन्हा नाही, हिंदू धर्मात…”, तेज प्रताप यांना खासदारांचं समर्थन
लालू प्रसाद यादव यांनी बेजबाबदार वर्तनामुळे मुलगा तेज प्रताप यादव यांना राष्ट्रीय जनता दल पक्ष आणि कुटुंबातून हाकलले. खासदार सुधाकर सिंह यांनी तेज प्रतापच्या समर्थनार्थ वक्तव्य केले. सिंह म्हणाले की, दोन-तीन लग्ने करणे गुन्हा नाही. तेज प्रतापने फेसबुकवर एका महिलेबरोबरचा फोटो शेअर केला होता, ज्यामुळे वाद निर्माण झाला. ऐश्वर्या रायने तेज प्रतापच्या हकालपट्टीला "निवडणूक नाटक" म्हटले आहे.