जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरचा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वरचा पाकिस्तानात गूढ मृत्यू
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याचा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वर याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. ताहिर अन्वर जैशच्या कारवायांमध्ये सक्रिय होता. बहावलपूर येथे त्याच्यावर गुप्ततेत अंत्यसंस्कार झाले. ताहिरचा मृत्यू मसूद अझर आणि जैशसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारताच्या कारवायांमुळे जैशचे अस्तित्व धोक्यात आले आहे.