इस्रायल-इराण, युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले…
पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन आणि पश्चिम आशियातील सशस्त्र संघर्षावर आपली भूमिका मांडली.