श्रीलंकेत एका माकडामुळे आख्ख्या देशातला वीजपुरवठा खंडित; रविवारी तीन तास ‘ब्लॅकआऊट’!
रविवारी श्रीलंकेत एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात गेला. सेंट्रल पॉवर ग्रीडच्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आलेल्या माकडामुळे वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला. सकाळी ११ वाजता वीज गायब झाली आणि प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे प्रयत्न सुरू केले. ऊर्जा मंत्री कुमारा जयकोडी यांनी ही माहिती दिली. तीन तासांनंतर काही भागात वीजपुरवठा सुरळीत झाला, पण संपूर्ण देशात वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागला.