मुंबई ते मुंबई व्हाया बांगलादेश! ‘बांगलादेशी’ म्हणून पडलेला चुकीचा ठपका अन्..
मुर्शिदाबादचे मेहबूब शेख आणि मिनारूल शेख यांना बांगलादेशी असल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेऊन बांगलादेशात पाठवण्यात आलं होतं. नंतर भारतीय असल्याचं सिद्ध झाल्यावर त्यांना परत आणलं. परंतु, त्यांची संसाराची घडी विस्कटली. मेहबूब शेख मुंबईत परतले, तर मिनारूल काश्मीरला स्थायिक झाले. तृणमूल काँग्रेसने मदतीचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण झालं नाही. आता त्यांना ओळखीची कागदपत्रं पुन्हा मिळवण्याचा प्रश्न भेडसावतोय.