“मुस्लीम व्यक्ती एकाहून अधिक लग्न शकतो, पण…”, अलाहाबाद उच्च न्यायालयानं काय म्हटलं?
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम बहुपत्नीत्वावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, मुस्लीम व्यक्ती एकाहून अधिक पत्नी करू शकतो, पण सर्व पत्नींना समान वागणूक द्यावी लागेल. फुरकान नावाच्या व्यक्तीविरोधात बलात्कार प्रकरणात सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले.