सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘नाबार्ड’ मधे मोठी भरती, महाराष्ट्रात किती जागा?
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत (नाबार्ड) २०२६ साठी 'विकास सहायक गट ब' आणि 'विकास सहायक (हिंदी) गट ब' पदांसाठी १६२ जागांची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया १७ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ऑनलाइन होईल. महाराष्ट्रात सर्वाधिक ४९ जागा आहेत. उमेदवारांना पूर्व आणि मुख्य परीक्षा द्यावी लागेल. वयोमर्यादा २१-३५ वर्षे असून, काही प्रवर्गांना सूट आहे.