नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित नेहरूंचं ‘ते’ विधान वाचून दाखवलं; इंदिरा गांधींवरही टीकास्र!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत देशाच्या ७५ वर्षांच्या संविधान प्रवासावर चर्चा करताना काँग्रेसवर टीका केली. त्यांनी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर संविधानाला इजा पोहोचवल्याचा आरोप केला. मोदी म्हणाले की, १९५२ पूर्वी सिलेक्टेड सरकार होतं आणि संविधान बदलण्यासाठी ऑर्डियन्स काढले गेले. नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना संविधान बदलण्याचे पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले.